⚡मालवण ता.२९-: ओरोस येथे सुरू असलेल्या ५८ महाराष्ट्र बटालियन भारतीय थलसेना कॅम्प अंतर्गत पडवे येथील एसएसपीएम लाईफ टाईम हॉस्पिटल यांच्यामार्फत एनसीसी विद्यार्थ्यांसाठी डोळे तपासणी शिबिर राबविण्यात आले.
५८ महाराष्ट्र बटालियन मार्फत भारतीय थलसेना कॅम्प व सीईटीची कॅम्प ओरस या ठिकाणी १ जुलै ते १ ऑगस्ट या दरम्यान राबवला जात आहे. यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुमारे १२०० विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले आहेत. या कॅम्प मध्ये कर्नल दीपक दयाळ कमांडिंग ऑफिसर, सुभेदार मेजर गेडाम यांच्या वतीने नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या नेत्र तपासणी शिबीरात विद्यार्थ्यांना डोळ्याची निगा कशी राखावी व डोळ्यांच्या समस्यांबाबत काय इलाज करावा, या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ज्यांना डोळ्यांची समस्या आहे अशा विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. लाईफ टाईम हॉस्पिटलचे डॉक्टर संजय जोशी , पी. आर. ओ .विकास लूडबे व मनीष यादव, कॅम्प अंतर्गत असणारे एएनओ कॅप्टन आवटे, एएनओ ढेरे मॅडम, नंदकर, शेळके व इतर पीआय स्टाफ उपस्थित होता.
कमांडींग ऑफिसर कर्नल दीपक कुमार दयाळ, ॲडम ऑफिसर कर्नल लेखराज, सुभेदार मेजर दिनेश गेडाम, सुभेदार मेजर देवेंद्र सिंह, सुभेदार मेजर तुकाराम खैरनार, सुभेदार इंद्र केस, सुभेदार जितेंद्र तिवारी, बी एच एम सुरजीतसिंग इस्ट्रक्टर ,सुभेदार आर एन भांजा, यांच्या अधिनस्त हा कॅम्प सुरू आहे. यात एनसीसी विद्यार्थ्यांना फायरिंग ,ड्रिल, ऑप्टिकल, मॅप रीडिंग ,पॉईंट टू पॉईंट , ग्राउंड टू मॅप, मॅप टू ग्राउंड स्वयंमसरक्षण, निरोगी आरोग्य, स्वच्छता, सामाजिक भान, समाजसेवा, आपत्ती व्यवस्थापन योगा, युद्ध प्रशिक्षण, अशा अनेक बाबतीत एनसीसी कॅडेट्सना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात येत आहे, अशी माहिती लेफ्टनंट प्राध्यापक डॉ. एम. आर. खोत यांनी दिली.
