येणाऱ्या सर्व निवडणुकात घवघवीत यश मिळवून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना गिफ्ट देणार…

शिवसेना मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांचे प्रतिपादन..

मालवण दि प्रतिनिधी
प्रत्येक शिवसैनिकाला विश्वासात घेऊन आपण आमदार, खासदार यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली कामे तळागाळातील सर्व गावांमध्ये पोहोचवून शिवसेना अधिक मजबूत करतानाच येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकांमध्ये घवघवीत यश प्राप्त करून उद्धव ठाकरे यांना गिफ्ट देणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी येथे बोलताना केले

शिवसेना मालवण तालुका प्रमुख श्री. हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा प्रमुख बबन शिंदे, शहर प्रमुख बाबी जोगी, उपविभाग प्रमुख अमोल वस्त, प्रसाद आडवलकर, प्रसाद चव्हाण, यशवंत गावकर, सचिन गिरकर यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री. खोबरेकर म्हणाले, प्रत्येक शिवसैनिकाला विश्वासात घेऊन आपण आमदार, खासदार यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली कामे तळागाळातील सर्व गावांमध्ये पोहोचवा. तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकांमध्ये घवघवीत यश प्राप्त करून भगवा फडकवा. असे आवाहन करताना त्यांनी मालवण मधील सर्व शिवसैनिक, शाखाप्रमुख हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत असे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page