महसूंलला अखेर जाग आली ; सुशेगाद असणाऱ्या महसूलची
अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर कारवाई

⚡मालवण ता.२९-: मालवण तालुक्यातील खाडी पट्ट्यात राजरोस बेकायदेशीर वाळू उत्खनन आणि वाहतूक सुरू असताना गेले काही महिने सुशेगाद असणाऱ्या महसूल ,पोलीस आणि बंदर विभागाने साक्षात्कार झाल्याप्रमाणे कारवाईचा बडगा उचलल्याने खाडीपट्यातील गावामध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे आज शुक्रवारी अनधिकृतरित्या चिंदर तेरई येथून कणकवली येथे वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर महसूल पथकाने कारवाई करुन डंपर आचरा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

यासंबंधीचे अधिक वृत्त असे की, मालवण तालुक्यातील कालावली आणि कर्ली खाडी पट्यात गेले काही महिने मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रित्या वाळू उत्खनन आणि वाळूची वाहतूक होत असताना महसूल पोलीस आणि बंदर विभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नव्हती. ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रशासनाचे लक्ष वेधूनही कारवाई होत नव्हती. वाळू व्यावसायिकांमध्ये सध्या दोन संघटना कार्यरत आहेत त्यातील एका संघटनेच्या वाळू व्यावसायिकांवर प्रशासनाची मर्जी असल्याने खुलेआम पणे बेकायदेशीर वाळू उत्खनन होत असून त्यामुळे वाळू संघटनेचे अध्यक्ष बाबा परब यांनी बेकायदेशीर वाळू उत्खननावर कारवाई न झाल्यास रस्त्यात डंपर अडवून कारवाई करण्यास भाग पाडू असा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर प्रशासनाला जाग आल्याप्रमाणे कारवाई करण्यास सुरुवात केली. अलीकडच्या पाच सहा दिवसात दोनदा कारवाई झाली आहे. मात्र, प्रशासनाच्या या कारवाईत सातत्य राहण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. मालवण तालुक्यात होत असलेल्या बेकायदेशीर वाळू उत्खननावर जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केले असून राजकीय दबावापोटी प्रशासन कारवाई करण्यास धजत नाही अशी चर्चा आहे. वाळू व्यावसायिक संघटनेने इशारा दिल्यानंतर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे.

चिंदर तेरई ते कणकवली वाळू वाहतूक करत असलेला डंपर क्र. एम एच ०७ एजे २१७४ महसूल पथकाला चिंदर कुंभारवाडी येथे आढळून आला. वाळू पासाची विचारणा केली असता पास नसल्याचे आढळून आल्याने संबंधित डंपरवर कारवाई करुन आचरा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला. सदर
. कारवाई आचरा मंडल अधिकारी अजय परब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत चिंदर भटवाडी तलाठी योगेश माळी, तलाठी संतोष जाधव,आचरा तलाठी अनिल काळे, चिंदर पोलीस पाटील दिनेश पाताडे, वायंगणी पोलीस पाटील सुनिल त्रिंबककर,पोलीस हवालदार अमित जाधव आदी सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page