मळगाव येथे ३१ जुलै रोजी “आशिर्वाद गुरूमाऊलीचा

⚡सावंतवाडी ता.२९सहदेव राऊळ-: मळगाव येथील खानोलकर मंगल कार्यालय (सुधिर भागवत) येथे रविवार ३१ जुलै रोजी दुपारी २ वाजता जगदंब संगीत विद्यालय संचालक तबला/ पखवाज विशारद कु. रूपेश पोवार यांच्या विद्यालयाचा “आशिर्वाद गुरूमाऊलीचा” हा कार्यक्रम होणार आहे.


या कार्यक्रमाला मळगावातील सुप्रसिध्द किर्तन विशारद शेखर पाडगावकर, खानोलकर मंगल कार्यालयाचे मालक सुधिर भागवत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मान्यवरांच्या हस्ते उदघाटन झाल्यावर कार्यक्रमाची सुरूवात विद्यार्थाच्या सोलो वादनाने होणार आहे. त्यानंतर नवोदित भजनी बुवांचे गायन, वादन होणार आहे. त्यानंतर गुरुपूजन करण्यात येणार आहे. गुरुपूजनानंतर नादमृदूंगाचा हा कार्यक्रम होणार आहे. सर्वानी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जगदंब संगीत विद्यालयाचे संचालक रुपेश पवार, विद्यालयाचे विद्यार्थी आणि पालकांनी केले आहे.

You cannot copy content of this page