राष्ट्रनिर्माणची पायाभरणी शालेय शिक्षणात
उपप्राचार्य राजकिशोर हावळ

सिंधुदुर्गनगरी ता २९
आपल्याला राष्ट्र निर्माण करायचे आहे .त्याची पायाभरणी येथेच करायची आहे. प्रत्येकाने आपले काम प्रामाणिक करणे हीच देशसेवा आहे. देशसेवा करण्यासाठी केवळ सीमेवर जाण्याची गरज नाही .आपण जे क्षेत्र निवडतो त्यात प्रामाणिकपणे योगदान दिले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने यशस्वी व्हायचे असेल तर भरपूर अभ्यास आणि वाचनाची आवड जोपासली पाहिजे. असे प्रतिपादन विद्यार्थी गुणगौरव व विज्ञान प्रयोगशाळा उद्घाटन सोहळ्याप्रसंगी कुडाळ जुनियर कॉलेजचे व्हाईस प्रिन्सिपल राजकिशोर हावळ यांनी केले.

तळगाव हितवर्धक संघ संचालित श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय तळगाव मालवण शैक्षणिक वर्ष २०२१- २२ मध्ये दहावी उत्तीर्ण विद्यार्थी गुणगौरव व विज्ञान प्रयोगशाळा उद्घाटन सोहळ्याचे आयोजन केले होते. तळगाव हितवर्धक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या विद्यार्थी गुणगौरव व विज्ञान प्रयोगशाळा उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मेट्रोहम इंडिया प्रावेट कंपनी चेन्नईचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक परब उपस्थित होते. जुनियर कॉलेज कुडाळचे व्हाईस प्रिन्सिपल राजकिशोर हावळ, मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत पंडित ,तळगाव हितवर्धक संघाचे उपाध्यक्ष लहू राणे, सरचिटणीस आनंद दळवी, विवेक दळवी, प्रकाश चव्हाण, गुरुदास कुसगावकर, तानाजी पाटील, रामेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शैलजा शिरोडकर, यांच्यासह शिक्षक ,ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रामेश्वर माध्यमिक विद्यालय तळगाव येथील नवीन विज्ञान प्रयोग शाळेचे उद्घाटन मेट्रो हॅम इंडिया कंपनी चेन्नईचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक परब यांच्या हस्ते फीत कापून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. त्यानंतर सन २०२१- २२मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न झाला .या कार्यक्रमात बोलताना दीपक परब म्हणाले की रामेश्वर माध्यमिक विद्यालयाने सलग १४ वर्षे दहावीचा निकाल शंभर टक्के लावला आहे. ही कौतुकास्पद बाब आहे. तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी सुविधा निर्माण करून या विद्यालयाने आपली प्रगती साधली आहे. त्यामध्ये आज अद्यावत अशा विज्ञान प्रयोग शाळेची भर पडली आहे. या सर्व सोयी सुविधांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. व आपले भविष्य उज्वल करावे.

यावेळी कुडाळ महाविद्यालयाचे प्रिन्सिपल राज किशोर हावळ यांनी आपल्याला राष्ट्र निर्माण करायचे आहे. त्याची पायाभरणी येथेच करायची आहे. देश सेवा करण्यासाठी सीमेवर जाण्याची गरज नाही. आपण हाती घेतलेले काम प्रामाणिकपणे करणे हीच देशसेवा आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले भविष्य घडवण्यासाठी भरपूर मेहनत घेऊन अभ्यास केला पाहिजे. यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रामेश्वर माध्यमिक विद्यालय ग्रामीण भागात असूनही येथे आवश्यक त्या सर्व सुविधा आहेत. या विद्यालयाचा दहावीचा निकाल चांगला आहे याचे श्रेय येथील शिक्षक आणि संचालक मंडळाचे आहे. तळगाव हितवर्धक संघाचे चांगले सहकार्य मिळत असल्यामुळेच हे विद्यालय प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. यावेळी सन २०२१- २२ मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

You cannot copy content of this page