⚡कणकवली ता.२९-: कणकवली तालुका पत्रकार समितीच्यावतीने शनिवार ३० जुलै २०२२ रोजी दुपारी ३.३० वा. तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पंचायत समितीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात होणाऱ्या या सोहळयाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी पत्रकारांच्या दहावी, बारावी शिष्यवृत्ती आदी परीक्षांमध्ये यश मिळविलेल्या गुणवंत पाल्याचा सत्कार करण्यात येणार आहे. या सत्कार समारंभासाठी तालुक्यातील पत्रकार बांधवांनी त्याचप्रमाणे पत्रकार कुटुंबीय तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसंजय राणे, खजिनदार नितीन कदम तसेच तालुका पत्रकार समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकारणी सदस्य व सभासद यांच्यावतीने करण्यात आले आहे.
