शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे काम लवकर सुरू करा

खा विनायक राऊत यांची सार्वजनिक बांधकामाच्या अप्पर मुख्य सचिवांकडे मागणी

⚡ओरोस ता.२९-: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडे आज केली.

दरम्यान याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल, तशा सुचना देवून काम सुरू केले जाईल, असे आश्वासन श्री.सौनिक यांनी दिले.

You cannot copy content of this page