आ केसरकर यांचे दिवस जवळ आले

लवकरच त्यांना बोजा बिस्तारा गुंडाळावा लागणार;तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांचा इशारा

⚡सावंतवाडी ता.२७-: आमदार दीपक केसरकर यांचे दिवस आता जवळ आले असून, लवकरच त्यांना त्यांचा बोजा बिस्तारा गुंडाळून घरात बसवू असा इशारा तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी दिला आहे. आमदार दीपक केसरकर हे गेले काही दिवस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असून, त्याला आज तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

यावेळी राऊळ बोलताना पुढे म्हणाले की कोकण ही परशुरामाची भूमी आहे. या ठिकाणी घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला इतिहास आहे. त्यामुळे शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या आमदार दीपक केसरकर यांच्या पाठीशी कोकणी जनता कधीही राहणार नाही. त्यामुळे घरात बसून निवडून येण्याचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, असा विश्वास शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे व्यक्त केला.

शिवसेनेच्या आणि हिंदुत्वाच्या गोष्टी सांगणाऱ्या केसरकारांचे शिवसेनेतील वय अवघ्या साडेसात वर्षांचे आहे. नेहमी दगा फटका करून आपली राजकीय पोळी भाजणाऱ्या केसरकरांना निष्ठेच्या गोष्टी शोभत नाही, असा आरोप त्यांनी केला.

You cannot copy content of this page