शिवसेना प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांचा प्रश्न
⚡सावंतवाडी ता.२७-: पन्नास कोटी घेऊन भाजप सोबत सत्तेत गेलेले दीपक केसरकर हे किती दिवस सत्ता टिकवणार असा सवाल शिवसेनेचे प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे. मतदारसंघात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना देखील मतदार संघात फिरकत नसून, केवळ सत्तेसाठी आणि मंत्रिपदाच्या हव्यासापोटी मुंबईत बसले असल्याचा आरोप त्यानी यावेळी केला आहे.
यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, शिवसेनेशी गदारी करणाऱ्या केसरकरांनी हिम्मत असेल तर आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावे असे आवाहन ही दिले आहे. यावेळी शिंदे सोबत गेलेल्या 40 आमदारांचा सर्व्हे केला असता. त्यातील 16 आमदारांच निवडून येऊ शकतात असे निदर्शनास येत असून, यामध्ये आमदार दीपक केसरकर यांचा पराभव निश्चितच होणार असल्याचे निदर्शनास येत असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले आहेत.
