बाळा गावडे : शिवसेनेची जिल्ह्यात असलेली ताकद पुन्हा एकदा दाखवून देऊ
⚡सावंतवाडी ता.२८-: भाजपला सत्तेपासून दूर व राणेंना बाजूला करण्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश केला असल्याची माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत बाळा गावडे यांनी दिली.
दरम्यान येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेची जिल्ह्यात असलेली ताकद पुन्हा एकदा दाखवून देऊ असंही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ते सावंतवाडीत शिवसेना प्रवेशानंतर प्रथमच पत्रकारांची बोलताना ही माहिती दिली.
