लायन्स क्लब मालवणच्या अध्यक्षपदी सौ. वैशाली शंकरदास

⚡मालवण ता.२०-: लायन्स क्लब ऑफ मालवणची २०२२- ०२३ या वर्षासाठी नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी सौ. वैशाली शंकरदास यांची तर सचिवपदी सौ. अनुष्का चव्हाण, खजिनदारपदी सौ. अंजली आचरेकर यांची निवड करण्यात आली आहे. नूतन अध्यक्ष व कार्यकारी मंडळाचा शपथविधी व पदग्रहण सोहळा रविवार २४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता दैवज्ञ भवन मालवण येथे MJF ला. विरेंद्र चिखले (डिस्ट्रिक्ट जीएसटी कॉर्डिनेटर) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

लायन्स क्लब मालवणच्या नवीन कार्यकारिणी मध्ये प्रथम उपाध्यक्ष :- ला. सहदेव बापार्डेकर, द्वितीय उपाध्यक्ष :- ला. श्याम नार्वेकर, तृतीय उपाध्यक्ष :- ला. सचिन शारबिद्रे, सह सचिव :- ला. सौ. स्नेहा जामसंडेकर, सह. खजिनदार:- ला. सौ. मिना घुर्ये, टेल व्टिस्टर:- ला. सौ. राधिका मोंडकर, टेमर :- ला. सौ. सोनाली पाटकर, स्वच्छ भारत :- ला. सौ. रुपा कांदळगावकर, लायन क्वेस्ट:- ला. सौ. दिक्षा गांवकर मेंबरशिप चेअरमन :- ला. सौ. जयश्री हडकर, पी. आर. ओ. :- ला. राजा शंकरदास, जी. एस. टी. चेअरमन :- ला. डॉ. अमोल झांटये, जी. एल. टी. चेअरमन :- छा. दत्ताराम रेवणकर, जी. एम. टी. चेअरमन :- ला. विराज आचरेकर, संचालक- ला. डॉ. शशिकांत झांट्ये ला. नाना साईल, ला. महेश अंधारी MJF, ला. रुजारिओ पिंटो MJF, ला. लक्ष्मीकांत खोबरेकर, ला. मुकेश बावकर, ला. उमेश नेरुरकर, ला. अरविंद सराफ, ला. उमेश शिरोडकर ला. मोहन पटेल, ला. गणेश प्रभुलकर, ला. अवधुत चव्हाण, ला. उदय घाटवळ, ला. महेश कारेकर ला. शांती पटेल यांची निवड करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page