⚡सावंतवाडी ता.२०-: :आमदार दिपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने कुडाळ तालुक्यातील अणाव येथील आनंदाश्रय आश्रमातील जेष्ठ अनाथ व्यक्तींना योग्य सुविधा मिळण्याच्यादृष्टीने संस्थेचे व्यवस्थापक श्री. परब यांच्याकडे रु. अकरा हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करत आर्थिकमदत करण्यात आली.
यावेळी श्री. अशोक दळवी-माजी सभापती पं.स. सावंतवाडी, श्री. प्रकाश बिद्रे-माजी उपगराध्यक्ष- सावंतवाडी नगरपालिका, मा. आमदार श्री. दिपकभाई केसरकर यांचे स्विय सहाय्यक श्री. गजानन नाटेकर, श्री. नारायण ऊर्फ बबन राणे माजी पंचायत समिती सदस्य, श्री. विश्वास घाग, श्री. शैलेश मेस्त्री, श्री. एकनाथ हळदणकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते
