सावंतवाडी येथे २७ जुलै रोजी तालुकास्तरीय मेहंदी स्पर्धा

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरें यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी शिवसेना महिला आघाडीतर्फे आयोजन

⚡सावंतवाडी ता.२०-: शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरें यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी शिवसेना महिला आघाडी तर्फे बुधवार २७ जुलै रोजी श्रीराम वाचन मंदिर येथे दुपारी २.३० ते ५.३० या वेळेत तालुकास्तरीय भव्य मेहंदी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.. ही स्पर्धा १८ ते ३० वयोगट व ३० पुढील वयोगट अशा दोन गटात घेतली जाणार आहे. दोन्ही गटासाठी प्रथम पारितोषिक १००० रुपये, द्वितीय पारितोषिक रूपये ७५० रुपये, तृतीय पारितोषिक ५०० रुपये, रुपये २०० प्रमाणे उत्तेजनार्थ प्रत्येकी ५ बक्षिसे तर सहभागी होण्याऱ्या *सर्वांना भेटवस्तू देण्यात येणार आहेत


मेहंदी दोन्ही हातावर घालावी. (पुढील बाजू), मेहंदी कोन आयोजक देतील, मेहंदी काढणाऱ्या महिलांनी स्वतः सोबत हातावर मेहंदी काढण्यासाठी महीला आणावी, हि स्पर्धा केवळ महिलांसाठी/युवतीसाठी आयोजित केली आहे, येताना आधारकार्ड झेरॉक्स आणावे, अशा स्पर्धेच्या काही अटी आहेत. नोंदणी करण्यासाठी ८३९०९५४८७१ ७७७४९०४९७७ या
नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page