आमदार दीपक केसरकर : चौकुळ कबुलायतदार प्रश्न लवकरच सुटणार!
⚡सावंतवाडी ता.१६-: आंबोली गेळे येथे गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेला कबुलायतदार प्रश्न आजच्या बैठकीत सुटला असून, त्याबाबत योग्य निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून, ती सर्व जमीन त्या ग्रामस्थांच्या नावावर लवकरच होणार असल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. त्याचप्रमाणे जसा गेळे येथील प्रश्न सुटला तसाच चौकुळ येथील कबुलायतदार प्रश्न सुटणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, आंबोलीत पर्यटन विकास व्हावा यासाठी गोल्फ कोर्स होणार असून, त्यामुळे जिल्ह्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहेत.
