शिक्षक समितीने दिला आजारी
विद्यार्थिनीला मदतीचा हात

⚡कणकवली ता.१६-: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. गेली अनेक वर्षे संघटनात्मक कार्य सुरु असताना विद्यार्थी हिताच्या दृष्टीने काम करणारी संघटना म्हणूनही समितीकडे पाहिले जाते.
जिल्हा परिषद केंद्रशाळा खारेपाटण नं.१ ची सहावीत शिकत असलेली विद्यार्थिनी सारंगी संतोष कानडे ही गंभीर आजारी असल्याचे समजताच संघटनेमार्फत तिला पाच हजार रुपयांचा मदतीचा हात देण्यात आला.
सदर विद्यार्थीनीची आर्थिक परिस्थिती गरिबीची आहे. तिच्यावर मुंबई येथे उपचार सुरु आहेत. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या कानी ही बातमी पोहोचताच कणकवली तालुकाध्यक्ष टोनी म्हापसेकर , तालुका सरचिटणीस महेंद्र पवार , शिक्षक बँकेचे संचालक आनंद तांबे , प्रवक्ते विनायक जाधव , संदिप गोसावी , प्रकाश बुचडे , श्रीकृष्ण ठाणेकर यांनी खारेपाटण नं.१ चे मुख्याध्यापक प्रदिप श्रावणकर यांजकडे मुलीला देण्यासाठी पाच हजार रुपयांचा धनादेश सुपुर्द केला.

You cannot copy content of this page