⚡मालवण ता.१६-: शालेय जीवनापासूनच मुलांनी व्यवसाय व उद्योग यावर भर देण्याची गरज असून आजकाल सद्या रोजगारासाठी युवकांचा कल हा शहराकडे वाढू लागला आहे मात्र विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय उद्योग स्थापन करून इतरांना रोजगार मिळवून दिला तर मुंबई पुणे सारख्या शहरांकडे वळलेल्या युवकांचा ओढा थांबेल असे प्रतिपादन विरण येथील गणेश कॅश्यु फॅक्टरीचे मालक आणि उद्योजक श्री सुरेश नेरूरकर यांनी वडाचा पाट येथे बोलताना केले
श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट येथील एम एस ए टी विभागाअंतर्गत जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गणेश कॅश्यु फॅक्टरी विरणचे मालक श्री सुरेश नेरूरकर, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी.एच .कुबल, एम एस ए टी विभागाचे निदेशक श्री जगन्नाथ आंगणे, श्रीम हर्षदा पाटकर , श्रीम कविता माडये आदी मान्यवर उपस्थित होते . प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी.एच .कुबल यांनी प्रास्ताविक केले.
प्रमुख पाहुणे उद्योजक श्री सुरेश नेरूरकर यांनी युवा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी ज्या विद्यार्थ्यांना व्यवसाय उद्योग स्थापन करायचा असल्यास आपण त्यांना वेळोवेळी सहकार्य करू अशी ग्वाही दिली.
एम एस ए टी विषयाच्या सर्व विद्यार्थ्यानी स्वतःच्या कौशल्याचा वापर करून विविध प्रकारचे पदार्थ तसेच विविध प्रतिकृती , विणकाम केलेल्या शिलाई काम केलेल्या वस्तू शेती उपयोगी अवजारे , शेती ला आवश्यक सेंद्रिय कीटक नाशक, जीवामृत ,पोटॅश यांचे शाळेच्या आवारात प्रदर्शन भरविले होते. विद्यार्थ्यांनचा उत्साह आणि कौशल्य पाहून श्री नेरूरकर भारावून गेले. या प्रदर्शनासाठी एम एस ए टी विभागाचे निदेशक श्री जगन्नाथ आंगणे, श्रीम हर्षदा पाटकर , श्रीम कविता माडये यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले . या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ.वेदिका दळवी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीम प्रतिभा केळुसकर यांनी केले यावेळी विज्ञान शिक्षिका सौ सनये, ज्येष्ठ लिपिक श्री महेश गावडे, शिपाई श्री गुरुदास हडकर उपस्थित होते.
