वनविभागाने रचला सापळा;कट्टा कॉर्नर येथे सुरू आहे माकडाचा उच्छाद
बांदा
बांदा कट्टा कॉर्नर परिसरात उच्छाद मांडणार्या माकडाला पकडण्यासाठी वनविभाग सतर्क झाला आहे. त्यासाठी बांदा वनपाल अनिल मेस्त्री यांनी सलूनच्या समोर पिंजरा बसविला आहे. लोखंडी पिंजर्यात आरसा व केळी टाकण्यात आली आहे. बर्याच वेळा नुकसानी करुनही वनविभाग मात्र झोपेतच होता. आज अखेर त्यांना जाग आल्याचे दिसून आले.
बांदा कट्टा कॉर्नर परिसरात गेल्या महिन्यात सुजाता फोटो स्टुडिओचे माकडाने अतोनात नुकसान केले होते. काल गुरुवारी सायंकाळी नाना कदम यांच्या सलून दुकानातील आरसा व इ्तर सामानाची नासधूस केली होती. नुकसानी पाहणी दरम्यान बांदा वनपाल अनिल मेस्री यांनी स्थानिक व्यापार्यांना माकडाचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शुक्रवारी दुपारी पिंजरा लावण्यात आला. लोखंडी पिंजर्यात माकड जेलबंद होईल असा विश्वास बांदा वनपाल अनिल मेस्त्री यांनी व्यक्त केला.
यावेळी सरपंच अक्रम खान, ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर, बाळू सावंत व वन कर्मचारी उपस्थित होते.
