महात्मा गांधी विद्यालय श्रावण शाळेत वह्या वाटप

⚡कणकवली ता.१५- महात्मा गांधी विद्यालय शाळा श्रावण नंबर १ ता. मालवण येथे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून माजी जि.प.अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या माध्यमातून वह्या वाटप करण्यात आले.

यावेळी श्रावण गावचे सरपंच प्रशांत परब, महात्मा गांधी तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष संभाजी परब, श्रावण गावातील युवा कार्यकर्ते स्वप्निल कोळंबेकर, गुरुप्रसाद चव्हाण, गणेश बाईत, स्वप्निल दळवी, आकाश परब, निवृत्ती परब, स्वप्निल परब, मंदार परब यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना चार चार फुल साइज वह्या देणगी स्वरूपात वाटप केल्या.

यावेळी स्वप्नील कोळंबेकर यांनी शैक्षणिक साहित्याचे महत्त्व सांगून सर्वांच्या वतीने विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. अशाप्रकारे गावातील श्रावण गवळीवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांना देखील वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रमाणे गावचे सरपंच प्रशांत परब यांच्या प्रयत्नातून दरवर्षी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले जाते. याबद्दल शाळेच्या वतीने या सर्व मान्यवरांचे विशेष आभार मानण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक स्मिता किंजवडेकर, शिक्षक विनायक हरकुळकर, साक्षी कुबल, रागिनी ठाकूर, सचिन घोटाळे तसेच रोहिणी पवार, सुवर्णा दळवी आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विनायक हरकुळकर यांनी मांडले.

You cannot copy content of this page