वक्तृत्व स्पर्धेत प्रांजल मोहिते प्रथम तर अर्थव तेली द्वितीय तर समर्थ घाडी तृतीय
⚡कणकवली ता.१३-: गुरुपौर्णिमेनिमित्त कणकवली शिवाजीनगर येथील ट्विंकल स्टार प्ले स्कूलमध्ये गुरुप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात प्रांजल मोहिते हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. अर्थव तेली द्वितीय तर समर्थ घाडी तृतीय
क्रमांक प्राप्त केला. उत्तजेनार्थ विभावरी तोरणे हिने पारितोषिक पटकाविले.
या स्पर्धेत तेजश्री लाटे,ऋग्वेद केळुसकर, अथर्व गंगावणे, मंथन धुरी, उत्कर्षा पुजारे, राधा कामत, दक्ष आरोदेकर, भूवरी बिडये, स्वरा कोकरे, त्रियोग वाळके,
आहील पटेल आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी ट्विंकल स्टार प्ले स्कूलच्या संचालिका सुनीता कदम, शिक्षिका अंजली आजगावकर यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते. गुरुपौर्णिमेनिमित्त स्कूलमध्ये विविध कार्यक्रम पार पडले. यात विद्यार्थ्यांना उत्स्फूर्तपणे सहभाग घेत त्यांनी गुरुंचे आशीर्वाद घेतले.
