कणकवलीत भालचंद्र महाराज संस्थान येथे गुरुपौर्णिमा उत्साहात

दर्शन घेण्यासाठी संस्थान परिसरात भाविकांची गर्दी

⚡कणकवली ता.१३-: कणकवली येथील भालचंद्र महाराज संस्थानात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.

या उत्सवानिमित्त भालचंद्र महाराज संस्थानात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. बाबांचे दर्शन घेण्यासाठी संस्थान परिसरात भाविकांची गर्दी
झाली होती. या उत्सवानिमित्त मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण होते.
गुरुपौर्णिमेनिमित्त भालचंद्र महाराज संस्थानात पहाटे ४.३० समाधी पूजन, पहाटे ५.३० वा.काकड आरती, ७ ते दुपारी १२ पर्यंत भक्त गणांच्यावतीने पाद्यपूजा करण्यात आली. त्यानंतर सत्यनारायणाची पूजा पार पडली. दुपारच्या सत्रात भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त भजनी कलाकरांनी भजने सादर करुन वातावरण भक्तीमय करुन टाकले.भालचंद्र महाराजांची मूर्ती हारतुऱ्यांनी सजविण्यात आली होती. दिवसभर भालचंद्र महाराजयांच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात भाविकांची रिघ लागली होती.रात्रीच्या दैनदिन आरतीने
या उत्सवाची सांगता होणार आहे. भालचंद्र महाराज संस्थानसह शहरात ठिकठिकाणी
गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.

You cannot copy content of this page