माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूंच्या वाढदिवसानिमित्त तळवडे येथे शैक्षणिक साहित्य वाटप

⚡सावंतवाडी ता.११-: : गीतरामायण फाऊंडेशन, सिंधुदुर्ग व अटल प्रतिष्ठान संचलित चाईल्ड लाईन, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण सुपूञ व माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा वाढदिवस जनता विद्यालय, तळवडे येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप करून साजरा करण्यात आला.


या दोन्ही संस्थाच्या वतीने जनता विद्यालय, तळवडे प्रशालेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष, चाईल्ड लाईनचे संचालक आणि गीतरामायण फाऊंडेशनचे कार्यवाह अॅड. नकुल पार्सेकर, सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रुपेश पाटील, गीतरामायण फाऊंडेशनचे खजिनदार प्रकाश दळवी, मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते रविंद्र पडते, चाईल्ड लाईनच्या समन्वयक पुनम पार्सेकर, प्रशालेचे मुख्याध्यापक प्रतापराव देसाई पर्यवेक्षक दयानंद बांगर, महिला समुपदेशनाच्या समुपदेशक नमिता परब, टिम मेंबर प्रज्ञा जाधव, विश्वनाथ सनाम, शाळेतील शिक्षक व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांनी ग्रामीण भागातील मुलांची शिस्त पाहून समाधान व्यक्त केले. तसेच सामाजिक संस्थांनी जिल्ह्यातील अशा गरजवंतांना मदतीचा हात दिला पाहिजे, आपण नेहमी अशा विधायक कार्यात सहभागी होऊ, अशी भावना व्यक्त करत आपल्याला आजच्या कार्यक्रमात सहभागी करून घेतल्याबद्दल अॅड.पार्सेकारांचे आभार मानले. यावेळी युवराज्ञी यांनी शाळेतील आणखीन पंधरा मुलांना स्कूल बॅग्ज देण्याचे मान्य केले.
यावेळी अॅड. नकुल पार्सेकर यांनी सांगितले कि, आपण ज्या ज्या सामाजिक संस्थावर कार्यरत आहोत, त्या विविध संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्यातील गरजू घटकांना विविध प्रकारे मदत करत असून कोरोना काळातही अनेक प्रकारची मदत केल्याचे त्यांनी सांगितले. यापुढेही ग्रामीण भागातील शाळांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करणार असल्याचे सांगितले.
प्रा. रूपेश पाटील यांनी उपस्थित मुलांशी संवाद साधून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपूत्र माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या यशोगाथा मुलांना सांगितल्या. तसेच यशस्वी व्यक्तिंच्या यशाची कारणमीमांसा स्पष्ट केली.
प्रशालेचे मुख्याध्यापक देसाई यांनी अशा अनेक संस्था प्रशालेच्या उपक्रमांना नेहमीच सहकार्य करत असतात. ग्रामीण भागातील शाळांच्या गरजा ओळखून यापुढेही मदतीची अपेक्षा व्यक्त केली. तसेच शाळेतील उपक्रमशील सहशिक्षिका सुश्मिता चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नामुळे हा कार्यक्रम संपन्न झाला, याचा विशेष उल्लेख केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सुश्मिता चव्हाण यांनी केले.

You cannot copy content of this page