भिमगर्जना बौद्ध मंडळाच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

सेवानिवृत्त बांधवांचाही केला सन्मान

⚡सावंतवाडी ता.१०-: भिमगर्जना बौद्ध मंडळ सावंतवाडी यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सत्कार समारंभ आज सावंतवाडी समाज मंदिर येथील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी राणी पार्वती देवी हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक श्री व्ही.बी.नाईक सर आणि ज्येष्ठ वकील श्री पणदुरकर सर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

यावेळी माजी नगरसेवक श्री गोविंद उर्फ तानाजी वाडकर, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष श्री लक्ष्मण निगुडकर, अँड. श्री अनिल निरवडेकर, श्री. चौकेकर आदी उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माजी मुख्याध्यापक श्री नाईक सर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मेहनत घेतल्यास यश दूर नाही, आज अनेक क्षेत्रात करियर करण्याची विद्यार्थ्यांकडे संधी असून, त्या संधीचा विद्यार्थ्यांनी पुरेपूर वापर केल्यास यश मिळवता येते. असे अनमोल मार्गदर्शन केले.

यावेळी माजी नगरसेवक गोविंद वाडकर यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्वतःचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे. या काळात शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. त्यामुळे आपले भविष्य उज्वल करण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचले पाहिजे, वाचाल तर वाचाल असा मोलाचा सल्ला त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी नगरपालिकेमार्फत आपल्या समाजासाठी उपलब्ध करून दिलेल्या ग्रंथालयाचा सदुपयोग करून पुस्तके वाचा. आज बार्टी सारखी संस्था स्पर्धा परीक्षेचे मोफत ज्ञान देत असून, त्याचा उपयोग करून मोठ्या पदावर जाऊन आपल्या आई वडील यांच्यासह समाजाचे नाव उज्ज्वल करा असे मार्गदर्शन केले.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष मंगेश कदम, सचिव प्रवीण कांबळे, प्रशांत पाटणकर, दया जाधव, निवेद कांबळे, हेमंत कांबळे, मानसी कदम, मिनाक्षी पवार, ललिता कांबळे, सुरेश खोब्रागडे, धोंडी अनावकर, नारायण जाधव, अनिकेत जाधव लतेश पवार, रुपेश जाधव जयवंत जाधव, ज्योती जाधव आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page