आमदार नितेश राणेंनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन

आम. नितेश राणे यांचा महेश इंगळेंच्या हस्ते सत्कार

⚡देवगड ता.१०-: भारतीय जनता पार्टीचे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.


यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी आमदार नितेश राणे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद,प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी मा. नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, भारतीय पार्टीचे शहराध्यक्ष शिवशरण जोजन, तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव, नन्नू कोरबू, बालाजी पाटील, सिद्धाराम टाके, विपुल कडबगावकर, ऋषिकेश होणारी, श्रीकांत मलवे व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page