संदेश पारकर यांचा सवाल;पुतळा हटविल्या प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार
⚡कणकवली ता.१०-: कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपतींचे
भव्यदिव्य स्मारक व्हावे ही आमची व शिवप्रेमीची भूमिका आहे .मात्र लुटारू सत्ताधारी व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे अवमूल्यन केले हे चुकीचे आहे.पहाटे लुटारू पध्दतीने हा पुतळा हटविण्यात आला.नगरपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांमध्ये हिम्मत होती तर दिवसा पुतळा दिवसा का काढला नाही?यात जिल्हाधिकारी कार्यालयाचे दोन अधिकारी ,प्रांताधिकारी, तहसीलदार व नगरपंचायत अधिकारी यांचा हात आहे.त्यामुळे या विरोधात आपण उच्च न्यायालयात दाद मागणार आणि या सर्व अधिकारी व लोकप्रतिनिधीना जबाबदार धरणार असल्याचा इशारा शिवसेना नेते कोकण पर्यटन समिती उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी दिला.राज्यात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर, मुस्लिम आरक्षण तसेच शेतकरी समस्या यासारखे अनेक प्रश्न असताना पहिलाच घाला या या सरकारने शिवछत्रपती यांच्यावर घातला असल्याचा आरोप संदेश पारकर यांनी केला.
कणकवली येथील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना नेते संदेश पारकर बोलत होते.यावेळी शिवसेना नेते अतुल रावराणे, उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव,उपतालुकाप्रमुख राजू राणे राजू राठोड ,जानवली सोसायटी चेअरमन दामू सावंत आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
संदेश पारकर म्हणाले,कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपतींचा पुतळा बाधित होता.त्यावेळी तो पुतळा रातोरात गटारावर बसवत असताना मी विरोध केला.त्यानंतर शिवसेनेने छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा उभारत भव्य स्मारक कणकवलीत व्हावं अशी भूमिका घेतली होती.मात्र,आ.नितेश राणे ब कणकवली सत्ताधाऱ्यांनी रातोरात पुतळा हटवला.छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान,अवमूल्यन केले आहे.तत्पूर्वी दुसरा पुतळा बाजूला ठेवला तेव्हा पोलीस अधिकारी यांना आ.नितेश राणेंनी बदली करण्याची धमकी दिली.या आमदार ,नगरपंचायत सत्ताधाऱ्यांची दिवसा पुतळा हटविण्याची हिम्मत नव्हती का?
राज्यात गुंडांचे व दरोडेखोरांचे राज्य आले, हे रातोरात छत्रपतीचा पुतळा हटवून दाखवून दिले आहे असा घणाघाती आरोप शिवसेना नेते संदेश पारकर यांनी केला.
या छत्रपतींच्या पुतळ्याबद्दल जि. प.च्या १८ गुंठे जागेत अश्वारूढ पुतळा उभारण्यात यावा अशी शिवसेनेची भूमिका आहे. तसे महामार्ग प्राधिकरण विभागाचे पत्र जिल्हा परिषदला दिले.त्यावेळी जिल्हा परिषदेतमध्ये आ.नितेश राणे यांचीच सत्ता होती. त्यावेळी का दिली नाही परवानगी? आता काळोख्या रात्रीत केलेले कृत्य ही बेगडी प्रेमापोटी आहेत.
चार दिवसांपूर्वी नगराध्यक्ष व अन्य अधिकारी उपस्थित असताना अनधिकृत पुतळा उभारला. तेव्हा एक पोलीस अधिकारी यांनी रोखण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी नितेश राणे यांनी धमकी दिली, आमदारांची ही दहशत जनता खपवून घेणार नाही.या दहशतवादी वृत्तीला खतपाणी घालण्याचे काम प्रशासनांने केले असल्याचा आरोप संदेश पारकर यांनी केला.
सरकारी जागेत भव्यदिव्य स्मारक व्हावं, ही मागणी मी केली आहे.त्यावर माजी पालकमंत्र्यांनी २० गुंठे जमिनीत पुतळा व्हावा,शिवसेनेची भूमिका मांडली.त्यानंतर पुतळा बसवण्याचे ठरले,पालकमंत्री म्हणाले त्याला अधिकृतपणे मान्यता द्यावी,चांगलं स्मारक स्टॉलवर कारवाई न करता करण्याचे ठरले.मात्र पहाटे बातम्या येतात. कुपणानेच शेत खाण्याचा प्रकार घडला आहे.पहाटे कारवाईची कृत्य करण्याचे कारण काय? छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा प्लास्टिकमध्ये बंद करण्यात आला होता. त्याला साफ करत शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत यांनी हार घातला होता. त्यांनतर पहाटे काळोखात हा पुतळा हटविण्यात आला.दरोडेखोर लोकांनी पुतळा कुठे ठेवला?असा सवाल संदेश पारकर यांनी केला.
पुतळा हटविण्याची ठेकेदाराने सुपारी दिली होती का?हा प्रश्न उपस्थित होत आहे.छत्रपती शिवाजी महाराज जेसीबीच्या सहाय्याने हटवीत विटंबना झाली आहे. .हे रयतेचे नाही तर लुटातूनचं राज्य आहे.जनतेला कालच कृत्य मान्य नाही,असेही संदेश पारकर म्हणाले.
सर्वपक्षीय लोकांना प्रशासनाने विश्वासात का घेतले नाही.शासनाच्या अधिकृत जागेत स्मारक व्हावे,ही आमची भूमिका आहे.माजी पालकमंत्री यांनी सुवर्णमध्य भूमिका घेतली आहे,त्यानुसार स्मारक करावे.छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक नव्या पिढीला मार्गदर्शक होईल.ज्या पध्द्तीने मोर्ये बिल्डिंग पाडली तसेच सार्वजनिक प्रॉपर्टी वर डल्ला मारला.कणकवली सत्ताधारी हे दरोडेखोर आहेत. असे पारकर म्हणाले.
अतुल रावराणे म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक वेगळं जिल्ह्याला महत्व आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक व्हावं,अशी शिवसेनेची भूमिका होती.आ.नितेश राणे यांनी पुन्हा स्टंट केला हा भ्याडपणा आहे.जर छत्रपतींच्या पुतळ्याबाबत नितेश राणे यांनी पुढाकार घ्यायचा होता,तर सर्वांना सोबत घेऊन करण्याची गरज होती,अशी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची अहवेलना होत असेल तर त्या लोकप्रतिनिधीवर अपात्रतेची कारवाई झाली पाहिजे.छत्रपतींचा अपमान झाला आहे,रात्रीच्या अंधारात कारवाई का केली?नवीन पुतळ्याची जबाबदारी कोण घेणार?जिल्हाधिकारी यांनी उत्तर दिले पाहिजे.न्यायालयीन लढाई आम्ही लढणार आहे,शिवसेना संदेश पारकर यांच्या सोबत असणार आहे.असे अतुल रावराणे म्हणाले.
