शिंदे सरकार अवघ्या सहा महिन्यातच कोसळेल

खासदार विनायक राऊत यांची टीका

⚡सावंतवाडी ता.०९-: दिपक केसरकर यांना अनेक पक्षाचे अनुभव आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी केसरकर यांना प्रवक्ते केल्याने हे सरकार फार काय काळ टिकणार नसून अवघ्या सहा महिन्यातच कोसळेल, आशी टिका खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.

राऊत म्हणाले, शिवसैनिक हे आमच्यासोबत आहेत. ते केसरकरांना बळी पडले नाहीत. केसरकर वारंवार मालवणात जाऊन बैठका घेत होते. त्याचवेळी आम्हाला या बेईमानीची जाणीव झाली होती. महाराष्ट्रातले विद्वान प्रवक्ते गद्दारांच नेतृत्व करत आहेत. केसरकर यांनी प्रत्येक पक्षाची चव चाखली आहे. सहा महिन्यात हे सरकार बुडणार आहे. यावेळी त्यांनी वैभव नाईक यांच कौतुकही केल.. ही कोणत्या बापाची औलाद आहे ज्या ताटात खाल्लं तिथंच घाण केली. आता त्यांना आम्ही शिवसैनिक असं म्हणताना लाज वाटली पाहिजे. भाजपसोबत जाऊन आम्हाला शहाणपणा शिकवता. वैभव नाईकांना यांना खोक्यांची ‘ऑफर’ आली होती पण ते बळी पडले नाहीt आगामी काळात वैभव नाईक पालकमंत्री असतील असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page