मालवण ज्येष्ठ नागरिक संघाची सभा ११ रोजी

⚡मालवण ता.०८-: ज्येष्ठ नागरिक सेवा संघ (फेस्कॉन संलग्न), मालवणची पंधरवडा सभा ११ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजता येथील हॉटेल लीलांजली, भरड येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेत आषाढी एकादशीनिमित्त संघाच्या सदस्यांकडून अभंगवाणी व भक्तिगीत कार्यक्रम सादर केला जाणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यवाह बाळकृष्ण माणगावकर यांनी केले आहे..

You cannot copy content of this page