⚡मालवण ता.०८-: मालवण तालुक्यातील १४ पंचायत समिती मतदारसंघांसाठी आरक्षण सोडत दि. १३ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता येथील तहसील कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियमाप्रमाणे जागांच्या व आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम नियमानुसार अनुक्रमे जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती / जमाती (स्त्रियांच्या आरक्षणासह) राखून ठेवायच्या जागा आणि उर्वरित स्त्रियांसाठी राखून ठेवायच्या जागा निश्चित कराव्यात, अशा सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. १३ रोजी आरक्षण निश्चिती, १५ रोजी प्रारुप प्रसिद्धी आणि हरकतींसाठी १५ ते २१ जुलैपर्यंत मुदत दिली आहे, अशी माहिती तहसीलदार पाटणे यांनी दिली.
