भाजपने दिले वीज अधिकाऱ्यांना निवेदन
देवगड
देवगड तालुक्यामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत असून नागरिकांना व व्यापारी, उद्योजक ,व्यावसायिक यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत योग्य ती कार्यवाही तात्काळ करण्यात यावी. अशी मागणी भारतीय जनता पार्टी देवगड तालुक्याच्या वतीने उप अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी देवगड यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे सद्यस्थितीत पावसाळा जोरात सुरू असून वारंवार लाईट गेल्यामुळे सर्वांनाच कित्येक समस्यांना तोंड द्यावे लागते. विद्युत वाहिनींच्या बाजूला असलेली झाड्याच्या फांद्या तात्काळ तोडण्यात याव्यात त्यामुळे वीज गळतीचे प्रमाण कमी होईल तसेच देवगड तालुक्यामध्ये लाईनमनची संख्या कमी असून ते लाईनमन ताबडतोब भरती करण्यात यावे .या सर्व बाबींची तातडीने पूर्तता करण्यात यावी. अन्यथा भारतीय जनता पार्टी देवगड तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येइल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी भाजपा सरचिटणीस शरद ठुकरूल,माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर, नगर सेविका प्रणाली माने ,तन्वी चांदोस्कर मनीषा घाडी , शहर अध्यक्ष योगेश पाटकर, दयानंद पाटील ,राजा भुजबळ मिलिंद माने उपस्थित होते.
