देवगड केंद्रबल गटाचा बळीराजासाठी एक दिवस उपक्रम

देवगड (प्रतिनिधी)
बळीराजासाठी एक दिवस या जिल्हा परिषदेच्या उपक्रमांतर्गत शुक्रवारी अमोल राऊत यांच्या शेतामध्ये देवगड केंद्रबल गटाच्या वतीने उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात शेतीविषयक अवजारांची माहिती, प्रत्यक्ष शेतात तरवा काढणे, भात लावणी करण्यात आली.

या उपक्रमा स नगरसेविका तन्वी चांदोसकर ,नगरसेवक रोहन खेडेकर, माजी उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर, देवगड केंद्रप्रमुख स्नेहा पारकर, नारायण चव्हाण, विषय तज्ञ सुदाम जंजाळ ,प्राजक्ता कुलकर्णी ,एकनाथ बच्चे, राखी चव्हाण, विकास जांभवडेकर संदीप परब आनंद जाधव, दयाराम मोरे, उल्हास कदम, नवीन जाधव, रामेश्वर चौधरी, सचिन राणे इत्यादी उपस्थित होते. अमोल राऊत यांची मुलाखत घेऊन शेती व अवजारांची माहिती मिळविली. नगरसेविका तन्वी चांदोस्कर नगरसेवक रोहन खेडेकर ,माजी उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर यांनी मुलांसाठी खाऊ दिला. उपस्थित सर्वांचे स्वागत व आभार आनंद जाधव यांनी मानले.

You cannot copy content of this page