जिमखाना जाधववाडी येथील चुकीच्या कामाबाबत बबन साळगावकर यांची नाराजी

⚡सावंतवाडी ता.०८-: जिमखाना येथील जाधववाडी येथे चुकीच्या पद्धतीने काम केल्याने तेथील लोकांना जीव मुठीत धरून जीवन जगावं लागत आहे. तेथील घळण वारंवार कोसळत असताना तेथील जमिनीला देखील मोठ्या प्रमाणात भेग पडली असून, ती जमीन देखील कधीही खचून कोसळू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधून देखील कोणतीही उपाययोजना न करता, शासन कासवाच्या गतीने काम करत आहे. त्यामुळे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

You cannot copy content of this page