धनुष्यबाण’ शिवसेनेच्या हातातून जाण्याची शक्यता;

संजय राऊतांचं सूचक ट्विट

⚡मुंबई दि.०८-: एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे संपूर्ण पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्हच शिवसेनेच्या हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना वेळ पडल्यास नव्या चिन्हावर लढायची तयारी ठेवा, असे निर्देशही दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केले आहे. जब “खोने”के लिए कुछ भी ना बचा हो तो “पाने” के लिए बहुत कुछ होता हैं! जय महाराष्ट्र !., असे संजय राऊत यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

संजय राऊत यांच्या या ट्विटचा नेमका अर्थ काय, याविषयी सध्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.न्यायालयीन लढाईत पराभव झाल्यास आपल्याला ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह सोडावे लागू शकते, याची जाणीव उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना झाली आहे का, असा प्रश्न आता या ट्विटमुळे निर्माण झाला आहे.

You cannot copy content of this page