रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीच्या नवीन कार्यकारिणीचा १० रोजी पदग्रहण

⚡सावंतवाडी ता.०८-: सन2022 -23 या वर्षासाठी रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी यांची कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली आहे. हा वार्षिक पदग्रहण सोहळा रविवार 10 जुलै रोजी सायंकाळी 6 30 वाजता शालु मंगल कार्यालय मळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.

या सोहळ्याला इंस्टालिंग ऑफिसर RC कोल्हापूर MIDTOWN DGN नासिर बोरसादवाला यांच्या हस्ते होणार आहे यावेळी AG Rtn नीता गोवेकर Rtn बेलवलकर DGA Rtn प्रणय तेली उपस्थित राहणार आहेत. Service Above Self म्हणजे च मी आणि समाजासाठी माझे योगदान हे रोटरीचे घोषवाक्य आहे.

यावर्षीची रोटारीची थीम ही IMAGINE ROTARY ही आहे. रोटरी मधे 7 फोकस एरिया आहे त्यावरच वर्षभर कार्यक्रम राबविले जातात.

Fighting Diseases या अंतर्गत आरोग्यविषयक कार्यक्रम घेण्यात येतील यात चेक अप कॅम्पस महिलांसासाठी HB कॅन्सर डिटेकशन किशोरवयीन मुलींसाठी अस्मिता हा प्रोजेक्ट राबविण्यात येईल यामधे MHM म्हणजे Menstruel hygiene and management या अंतर्गत मुलींना मोफत pads टॅब्लेटस शैक्षणिक वस्तू वाटण्यात येतील. Deep and Dumb मुलांचे चेक उप कॅम्पस आणि त्या गरजु मुलांचे हीअरिंग एड चे वाटप करण्याचा मानस आहे त्याशिवाय Diabetes,Heart disease Camp eye check up camps cataract surgery गरजूंना मोफत करण्याचा मानस आहे क्लीन water & Hygiene या अंतर्गत ही कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

Supporting Education या अंतर्गत मुलांसाठी करिअर मार्गदर्शन 11 वी 12 वी नंतर काय किंवा MPSC UPSC यासारख्या स्पर्धा परिक्षबाबत तज्ज्ञांच्या मार्फत मार्गदर्शन करण्याचा ठरविले आहे.
Community Service मधून रोटरी नेहमीच 2 गोष्टींवर फोकस करते दुर्लक्षित घटक आणि तयाचे जीवन मग ते आरोग्य असेल शैक्षणिक असेल यावरच जास्तीतजास्त भर देऊनवर्षभर हे कार्यक्रम घेण्याचा मानस आहे

You cannot copy content of this page