जिल्हा वाहतूक शाखेच्या कार्यालयातून पास घेऊन जाण्याचे अनिल व्हटकर यांचे आवाहन
⚡सावंतवाडी ता.०७-: महाराष्ट्रातून आषाढी कार्तिकीला करोडो वारकरी पंढरपूरला माऊलीच्या दर्शनासाठी जात असतात. यावर्षी या वारीला वाहनाने जाणाऱ्या भाविकांसाठी महाराष्ट्र सरकारने टोल माफी दिली असून, सिंधुदुर्गातून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना टोल माफीचा पास उद्यापासून जिल्हा वाहतूक शाखेत मिळणार असून, ज्या भाविकांना पंढरपूरला जायचे आहे त्यानी जिल्हा वाहतूक शाखेच्या कार्यालयातून पास घेऊन जावेत असे आवाहन सपोनि अनिल व्हटकर यांनी केले आहे.
