नांगरतास येथील बी एस एन एल टॉवर सुरू करण्याची खासदार विनायक राऊत यांच्याकडे करणार मागणी…

शिवसेना विभाग अध्यक्ष बबन गावडे यांची माहिती

⚡आंबोली,ता.०७-: येथील नांगरतास येथे बी एस एन एल टॉवर बांधून ३ वर्षे झाली तरी अद्याप सुरू करण्यात आला नाही.याकडे संबंधित विभागाने लक्ष घालावे यासाठी खासदार विनायक राऊत यांच्याकडे मागणी करण्यात येणार आहे.

आंबोलीत बी एस एन एल टॉवर नांगरतास येथे खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून बांधण्यात येवून ३ वर्षे झाली तरी अद्याप सुरू झाला नाही.त्याठिकाणी रेंज मिळत नाही.आंबोलीत बाजारातील एका टॉवर ची रेंज अगदी कमी असून गायब असते.त्यामुळे दुसरा टॉवर सुरू करण्याची मागणी खासदार विनायक राऊत यांची भेट घेवून करण्यात येणार आहे.

संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी शिवसेना विभागीय अध्यक्ष बबन गावडे, बुधाजी पाताडे,अनिल चव्हाण यांनी प्रसिध्दी पत्रकातून केली आहे.

You cannot copy content of this page