⚡सावंतवाडी ता.०७सहदेव राऊळ-: : भारतीय नाविक सेना युनियन मुंबई यांच्यावतीने तळवडे नं. ९ शाळेततील मुलांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
भारतीय नाविक सेना युनियन यांच्या संकल्पनेतून,मागील कोरोना काळात प्रत्येक व्यक्तीची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे, याची दखल घेत सामाजिक बांधिलकीच्या हेतूने तसेच यंदा कोरोना संकट काळानंतर शाळा सुरू होत असून नेहमी सामाजिक कार्यात सहभागी असणारे भारतीय नाविक सेना युनियन मुंबई ,यांच्या वतीने शाळा तळवडे नंबर ९ च्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मोफत वह्या तसेच शालोपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी भारतीय नाविक सेना युनियनचे अध्यक्ष रवींद्र बाईग, जनरल सेक्रेटरी सुरेश साळसकर, पीआरओ राजेश कनोजिया,.प्रशांत कदम, पी आर ओ (तामिळनाडू) राजेश बाबू, सतीश सरोज ,सचिन खाड्ये, रमेश जोगनपल्ली, अक्षय आग्रे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीमती हरमलकर, उपाध्यक्ष मालवणकर, शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष आचरेकर व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण लोके उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वीतेसाठी मेहनत घ्यावी असे सांगत त्यांना सर्वतोपरी मदत करू तसेच भविष्याचे ध्येय निश्चित करण्याचे आवाहन याप्रसंगी भारतीय नाविक सेना युनियनचे जनरल सेक्रेटरी श्री. सुरेश साळसकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका अनुराधा सावंत यांनी तर सूत्रसंचालन दिगंबर तळणकर यांनी केले .कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुशांत गावडे, दीपक हरमलकर, विकास गावडे, राजेश मेस्त्री, शैलेश हरमलकर व अन्य ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.
