प्रभारी सरपंच दत्तू नार्वेकर; तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करा…
⚡आंबोली,ता.०७ अनिल चव्हाण-: येथील घाटात गटारीचे काम यावर्षी झाले नाही.ठिकठिकाणी वेली रस्त्यावर लोंबकळत आहेत.धोकादायक झाडे तोडली नाहीत.अळू गटार काम झाले नाही यामुळे मोरी जाम होवून घाट दरिकडचा भाग खचू शकतो.सार्वजनिक बांधकाम विभाग वनविभाग यांना सांगून देखील याकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी आंबोली प्रभारी सरपंच दत्तू नार्वेकर यांनी प्रसिध्दी पत्रकातून केली आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्ध पत्रक दिले असून त्यात असे नमूद करण्यात आले की आंबोली घाटात रस्त्यावरून पाणी जात आहे.त्याठिकाणी गटारी असणे आवश्यक आहे.पावसाळ्यात घाटाची सुरक्षितता घेणे आवश्यक आहे. घाटातील अतीअवजड वाहतूक धोकादायक आहे. मुख्य धबधबा या ठिकाणी वनविभाग आणि बांधकाम विभाग यांनी पर्यटकांसाठी ट्रॅफिक जाम होता नये यासाठी योग्य नियोजन करायला हवे.त्यासाठी लक्ष द्यावे.
