सिंधुदुर्गात जिल्हा परिषद ,पंचायत समिती मतदार संघासाठी 13 रोजी आरक्षण सोडत

⚡कणकवली ता.०६-: निवडणूकीचे वारे जोरदारपणे वाहू लागले असुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संपूर्ण राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून असलेल्या जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणुकांसाठीची प्रभागआरक्षण सोडत 13 जुलै रोजी होणार आहे .

जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे तर पंचायत समिती निर्वाचक गणांसाठी तहसीलदार कार्यालय येथे सोडत होणार आहे . सोडतीनंतर आरक्षणाची प्रारूप अधिसूचना 15 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून 21 जुलै पर्यंत हरकती व सूचना सादर करता येणार आहेत . प्राप्त हरकती व सूचना अभिप्रायासह जिल्हाधिकाऱ्यांकडून 25 जुलै पर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार असून राज्य निवडणूक आयोगाकडून 29 जुलै पर्यंत या आरक्षणाला मान्यता देण्यात येणार आहे . त्यानंतर दोन ऑगस्ट रोजी अंतिम आरक्षण प्रसिद्ध होणार आहे . या आरक्षणात अनुसूचित जाती , जमाती व सर्वसाधारण प्रवर्गातील महिला यांच्याकरिता जागा आरक्षित करण्यात येणार आहेत .

You cannot copy content of this page