सचिवपदी प्रमोद भागवत
⚡सावंतवाडी ता.०६-: रोटरी नववर्ष दरवर्षी 1 जुलै सुरु होते आणि याच दिवशी जगभरातील नविन रोटेरीयन नवा कार्यभार स्विकारतात. हा बदल जागतिक पातळी वर जगभरातील सर्व रोटरी डिस्ट्रीक्ट आणि त्यांच्या संपर्कांतील रोटरी क्लब्स मध्ये एकाच वेळी हे बदल घडतात. रोटरी क्लब, सावंतवाडीच्या नेतृत्वात बदल झाले असुन अध्यक्ष पदाची जबाबदारी पहिल्यांदा स्री अध्यक्ष रो.विनया बाड आणि रो.प्रमोद भागवत यानी सचिवपदाची जबाबदारी स्विकारली.
आणि 1 जुलैचे औचित्य साधुन डॉक्टर्स डे आणि चार्टर्ड अकाउंट डे माजगाव ग्रामपंचायतीत होमियोपथी पद्धतीने रुग्णांची तपासणी रो. डॉ स्नेहल गोवेकर आणि रो.सौ. तृप्ती गोवेकर या दांपत्यानी केली. यावेळी माजगाव परिसरात आरोग्य सेवा देणाऱ्या डॉ. धकोरेकर, डॉ. कासार आणि डॉ.गोविंद जाधव आणि रो.स्नेहल गोवेकर आणि रो.सौ.तृप्ती गोवेकर यांचा सत्कार करण्यात आले.
कमी वेळेत सूचना देवून सुद्धा माजगाव ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला. रुग्णांची तपासणी करून त्यांच्या लक्षणांनुसार होमिओपॅथिक औषधे मोफत वितरित करण्यात आली.तसेच प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत करणारे आर्सेनिक अल्बम या गोळ्यांचे वाटप गावातील प्रत्येक कुटुंबासाठी करण्यात आलिक. या शिबिरात कु.काजल कुबल यांनी औषधे वितरण करण्यास मदत केली.
सचिव रो.प्रमोद भागवत यानी कार्यक्रमाची प्रस्ताना केली. अध्यक्ष रो.विनया बाड यानी उपस्थितांचे स्वागत केले. माजी अध्यक्ष रो.डॉ.राजेश नवांगुळ यानी डॉक्टर्स डे चे महत्त्व आणि रोटरी क्लब, सावंतवाडीनी 2021-22 या सुवर्ण महोत्सवी वर्षात अध्यक्ष रो.साईप्रसाद हवालदार आणि सचिव CA.रो. सुधीर नाईक याच्या कार्याचा गौरव केला.उप केंद्राच्या डाॕ.धाकोरेकर पचायत सदस्या श्रीमती. निब्रे रो.दिलीप म्हापसेकर यानी आभार प्रदर्शन केले.
