जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेसाठी १७ रोजी मतदान

१७ पैकी ९ जागा बिनविरोध;८ जागांसाठी १७ उमेदवार रिंगणात

ओरोस ता.०६-:

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या १७ जागांतील ९ जागा बिनविरोध झाल्या असून आठ जागांसाठी १७ जुलै रोजी मतदान होणार आहे. या आठ जागांसाठी १७ उमेदवार रिंगणात आहेत, अशी माहिती जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाच्या कार्यालयीन अधीक्षक तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती यू यू यादव यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक १७ जुलै रोजी होत आहे. यासाठी ८६० मतदार निश्चित झाले आहेत. या पतसंस्थेचे एकूण १७ संचालक निवडून द्यायचे आहेत. यामध्ये आठ तालुक्यांतून आठ व जिल्हा मुख्यालयातून चार असे एकूण बारा संचालक सर्वसाधारण मधून निवडून द्यायचे आहेत. तर महिला राखीव, अनुसूचित जाती जमाती एक, इतर मागास प्रवर्ग एक आणि भटक्या विमुक्त जाती जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग एक अशाप्रकारे प्रतिनिधी निवडून द्यायचे आहेत. या १७ संचालक पदासाठी एकूण ३३ अर्ज दाखल झाले होते. यातील सर्वसाधारण १२ जागेतील सात जागा बिनविरोध झाल्या आहेत. तसेच अनुसूचित जाती जमाती, इतर मागास प्रवर्ग या दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आठ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले असून बुधवारी अंतिम उमेदवार यादी आणि निवडणूक चिन्ह प्रसिद्ध केले जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती यादव यांनी दिली.

You cannot copy content of this page