अमित इब्रामपूरकर यांनी घेतली मनसे नेते अमित ठाकरे यांची सावंतवाडीत भेट.

⚡मालवण ता.०५-: सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या मनसे नेते अमित ठाकरे यांची भेट अमित इब्रामपूरकर यांनी आज सावंतवाडी येथे भेट घेतली.यावेळी मनसे सरचिटणीस जीजी उपरकर,मालवण तालुका सचिव विल्सन गिरकर, शहर उपाध्यक्ष विशाल ओटवणेकर माजी उपस्थित होते.
महासंपर्क मनविसे पुर्नबांधणी दौरा अभियान अंतर्गत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष मा.अमितसाहेब ठाकरे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून आज सावंतवाडी येथे हॉटेल मँगो येथे सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग तालुक्यातील महाराष्ट्र सैनिक व पदाधिकारी यांची संवाद बैठक आज घेतली. तर ऊद्या बुधवारी सकाळी १०.३० वाजता मराठा समाज हॉल येथे कुडाळ-मालवण आणि दुपारी ०२.३० वाजता कणकवली-वैभववाडी-देवगड तालुका येथील पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक यांची संवाद बैठक होणार आहे.
उद्या अमित ठाकरे मालवण येथे येणार असुन मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरले आहे.

You cannot copy content of this page