१५ जागांसाठी ३० उमेदवार रिंगणात
ओरोस ता.०६-:
कुडाळ तालुका माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक चुरशीची होणार असल्याचे निश्चित झाले आहे. १५ जागांसाठी एकूण ५७ अर्ज दाखल झाले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या दिवशी यातील २७ जणांनी अर्ज मागे घेतल्याने ३० उमेदवार रिंगणात राहिले आहेत. त्यामुळे एकास एक लढत होणार आहे.
कुडाळ तालुका माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक १६ जुलै रोजी होत आहे. संचालक म्हणून एकूण १५ व्यक्तींना निवडून द्यायचे आहे. यामध्ये खुला प्रवर्ग दहा जागा, महिला राखीव दोन जागा, इतर मागास प्रवर्ग एक, अनुसूचित जाती आणि जमाती एक तर भटक्या विमुक्त जाती जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग एक अशाप्रकारे समावेश आहे. यासाठी ५७ एवढे विक्रमी अर्ज दाखल झाले होते. त्यातील २७ जणांनी माघार घेतल्याने ३० उमेदवार रिंगणात राहिले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकृष्ण मयेकर यांनी दिली.
