मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी नुकसान…

मालवण, दि प्रतिनिधी
सोमवारच्या मुसळधार पावसामुळे मालवणातील जनजीवन विस्कळीत झाल्यानंतर आज वरुणराजाने काहीशी उसंत घेतल्याने मालवणवासीयांनी सुटकेचा सुस्कारा सोडला मात्र अधून मधून पावसाची रिपरिप सुरू होती तर कालच्या मुसळधार पावसामुळे खोटले येथील सावित्री सत्यवान चव्हाण यांच्या घराची मागील बाजूच्या भिंतीची पडझड होवून सुमारे अठरा हजार रुपयाचे नुकसान झाले आहे तसेच शहरातील कचेरीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आज सायंकाळी आंब्याच्या झाडाची फांदी वीज वाहिनीवर पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता

मालवण शहर परिसरात वाऱ्यासह मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. यात आज सायंकाळी कचेरीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील विजवाहिनीवर आंब्याच्या झाडाची फांदी पडल्याने विजवाहिनी तुटून रस्त्यावर पडली. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक रहिवाशी संतोष मेस्त्री, वरद कांबळी, अक्षय मिठबावकर, चंद्रकांत धनावडे, श्री. धामापूरकर यांनी या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना, पादचाऱ्यांना याची माहिती देत रोखले. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. स्थानिक माजी नगरसेविका ममता वराडकर यांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी महावितरणशी तत्काळ संपर्क साधत माहिती दिली. त्यानंतर या भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांना बोलावून घेत विजवाहिनी जोडण्याचे काम सुरू करण्यात आले. यात पुन्हा विजवाहिनी तुटल्याने ती जोडण्याचे काम पूर्ण करत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

You cannot copy content of this page