पावसाने कुडाळ तालुक्यात उडविला आहाकार

२७ गावांचा तुटला संपर्क;निर्मला नदीने ओलांडली धोक्याची पातळी

⚡कुडाळ ता.०५-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा आहाकार उडाल्याचे पहायला मिळत आहे.कुडाळ तालुक्यातील निर्मला नदीने धोक्याची पातळी गाठली आहे.माणगाव येथील आंबेरी पूलावर पाणी आले आहे.आंबेरी पूलावर पाणी आल्याने माणगाव खोऱ्यातील २७ गावांचा संपर्क कुडाळ तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्याशी तुटला आहे.आंबेरी पुलावर पाणी आल्याने अनेक प्रवासी व शाळकरी विद्यार्थी अडकून या पुलावर अडकून पडले होते.कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील आंबेरी पुल या माणगाव खोऱ्यातील २७ पेक्षा जास्त गावांना जोडतो.पण माणगाव खोऱ्यात तुफान पाऊस झाल्याने या पावसाचा मोठा फटका या भागात बसला आहे.

या भागातील नदी,नाले तुडुंब भरले असून धोक्याची पातळी गाठली आहे.पुलावर पाणी आल्याने एस.टी.सह सर्व वाहतूक बंद होती.परिणामी वाहतूक ठप्प झाल्याची पहायला मिळाली. मुसळधार पाऊस झाल्याने या भागातील शाळा लवकर सोडण्यात आल्या पण आंबेरी पुलावर पाणी आल्याने विद्यार्थी मध्येच अडकून पडले होते. यावेळी येथील शिक्षकाने व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना मदत कार्य सुरू केले माणगाव खुरात धुवाधार पाऊस पडत असून या भागातील नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत.

You cannot copy content of this page