प्रभारी आ आशिष शेलार यांची माहिती
कणकवली ५ जुलै(प्रतिनिधी)
केंद्रीय भाजपाने माझ्यावर सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा प्रभारी पदाची जबाबदारी दिली आहे.त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलो आहे,बांदा येथील पूरस्थितीची आम्ही पाहणी केली आहे.तसेच लोकसभा जिंकण्यासाठी या आढावा बैठकीत चर्चा झाली.रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ भाजपा जिंकण्यासाठी पायाभरणी केली जात आहे. ,अशी माहिती भाजपा सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा प्रभारी आ.आशिष शेलार यांनी दिली.
कणकवली येथील प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली,आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय भारतीय जनता पक्षाने माझ्याकडे सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदार संघाची जबाबदारी आहे. आम्ही केंदीय योजनेचे काम करत आहोत.प्रमोद जठार हे चार लोकसभा संघाचे प्रभारी आहेत.आता लक्ष २०२४ लोकसभा निवडणुकीचे आहे.त्यादृष्टीनं आमचं नियोजन आहे.केंद्रातील मोदी सरकारच्या विविध योजना लोकांपर्यंत पोचविण्यासाठी आम्ही काम केलं पाहिजे.या ठिकाणी दुसऱ्या पक्षाचा खासदार आहे,त्यामुळे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा सिंध6 व रत्नागिरी दोन जिल्ह्यात २०,२१,२२ जुलै रोजी बैठका घेणार आहेत.
भाजपचे नेते आम्ही सर्वजण प्रंतप्रधान नरेंद मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे आम्ही अभिनंदन करतो.देशाच्या राष्ट्रपती या सर्वोच्च पदासाठी दौपती मुर्मू यांची उमेदवारी जाहीर केली.मुर्मू यांनी झारखंडचे राज्यपालपद, ओडिशात मंत्रिपद आणि आमदारपद,उपनगराध्यक्ष,एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले आहे, शिक्षण देण्यासाठी एका छोट्या खोलीत राहत उभारलेले काम प्रेरणादायी आले.एक आदिवासी महिला राष्ट्रपती पदी बसणार आहे.देशाच्या सर्वोच्च पदी एका आदिवासी महिलेला बहुमान मिळाला आहे.त्या १४ जुलैलामहाराष्ट्र राज्यात प्रचाराला येणार आहेत. आमदार यांच्यासोबत बैठक होईल,असे आ.आशिष शेलार यांनी सांगितले.
