मसुरे येथील युवा समाजसेवक अभिषेक धुरी याचे मुंबई येथे निधन

⚡मालवण ता.०५-: मसुरे गड घेरा बाजार पेठ येथील रहिवाशी युवा समाजसेवक आणि साई कृपा मित्र मंडळ मसुरे बाजारपेठ मुंबई चे सदस्य, अभिषेक मोहन धुरी वय ४० वर्षे याचे सोमवारी रात्री उशिरा ठाणा मुंबई येथे त्याच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले. मंगळवारी सकाळी ११ वाजता ठाणा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले

अभिषेक याचे मसुरे गावच्या सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान होते. सर्वांच्या मदतीला धावून जाणे व नेहमी हसतमुख राहून सर्वांना मदत करणे यासाठी मसूरे परिसरात अभिषेक ओळखला जात होता. कला क्रीडा नाट्य समाजसेवा या क्षेत्रातही अभिषेक याचे मोठे कार्य होते. मसुरे गावातील धार्मिक उत्सवातही ते हीरीरीने भाग घेत असायचे. अडीअडचणीच्या प्रसंगी सर्वांच्या मदतीला तो निस्वार्थीपणे धावून जात होता. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अभिषेक याच्या निधनामुळे मसुरे गावात हळहळ व्यक्त होत आहे

त्याच्या पश्चात आई, पत्नी, काकी, चुलत भाऊ,चुलत बहीण असा परिवार असून मसुरे येतील युवा सामाजिक कार्यकर्ते केदार धुरी यांचा तो सख्खा चुलत भाऊ आणि आंगणेवाडी येथील युवा कार्यकर्ते समीर आंगणे यांचा ते चुलत मेहुणा होत.

You cannot copy content of this page