*तारामुंबरी येथे घराची भिंत कोसळून पन्नास हजारांचे नुकसान*

⚡देवगड ता.०५-: तालुक्यात गेली काही दिवस अधून मधून मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू असून सोमवारी सकाळी तारामुंबरी संतवाडा येथील स्नेहा मनोहर तारकर यांच्या राहत्या घराची भिंत कोसळून रु ५०हजारांची हानी झाली आहे.यात कोणतीही जीवित हानी झाली नसून घराच्या भीतीचे नुकसान झाले आहे.या घरात एकटी ७० वर्षीय महिला रहात असून महसूल प्रशासन मार्फत तलाठी डी. बी.देशमुख यांनी रीतसर घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.

नगराध्यक्षा साक्षी प्रभू,पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे पोलीस पाटील श्रीमती खवळे यांनी भेट देऊन पाहणी केली.वयोवृद्ध महिलेला धीर दिला तसेच देवगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांनी गृहपयोगी वस्तूंची मदत केली आहे.

यावेळी हवालदार राजन जाधव उपस्थित होते. आतापर्यंत देवगड परिसरातील पावसाची नोंद मंगळवारी सकाळी १० वा. पर्यंत ११६१ मि. मी.एवढी झाली आहे .मागील २४ तासात ४५ मि. मी.एवढा पाऊस झाला आहे .दरम्यान तालुक्यातील काही भागात पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने वहातुक खोळंबली यात वाडा येथे पाणी रस्त्यावर आले परंतु पाणी ओसरल्यावर वहातुक सुरळीत झाली.

पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत देवगड पोलीस स्थानकाच्या हद्दीतील भागात भेट देऊन माहिती घेतली .या पावसात मंगळवारी सकाळी तारामुंबरी संतवाडा येथील स्नेहा मनोहर तारकर यांच्या राहत्या घराची भिंत पडून नुकसान झाले.महसूल प्रशासनाला याची महिती प्राप्त होताच तलाठी डी. बी.देशमुख यांनी रीतसर पंचनामा करून रु ५०हजार नुकसानीचा अंदाज वर्तविला आहे.

You cannot copy content of this page