Headlines

महिलेला वाचविणारे पोलीस दत्ता देसाई यांचा राष्ट्रवादीने केला सत्कार

⚡आंबोली ता.०५-: शौर्य दाखवून एका महिलेला वाहत्या नदीच्या प्रवाहातून वाचवल्याबद्दल सावंतवाडी राष्ट्रवादीच्यावतीन हवालदार दत्ता देसाई सत्कार केला.

गेळे येथील पुलाखाली हिरण्यकेशी नदीच्या मोठ्या प्रवाहात कुटुंबासोबत सेल्फी काढताना पाय घसरून पुढे वाहत जावून एका झाडाच्या फांदीला पकडुन २५ मिनिटे होती.

ही घटना कळताच आंबोली पोलीस तातडीने त्या ठिकाणी पोचले. यावेळी शौर्य दाखवत हवालदार दत्ता देसाई यांनी पाण्यात उडी मारून जान्हवी शिंदे कणकवली हिला वाचवले. दत्ता देसाई यांनी या आदी देखील सावंतवाडी मोती तलावात बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचविले होते. त्यांच्या या शौर्याबद्दल पोलिस अधीक्षकांनी देखिल त्यांचा सन्मान केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सावंतवाडीच्या माध्यमातून देखिल त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, इफ्तेकार राजगुरू, संतोष जोईल आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page