आचरे येथे ऑलिव्ह रिडले जातीच्या दोन कासवांना जीवदान देत सोडले समुद्रात

⚡मालवण ता.०५-: समुद्राच्या उधानावेळी समुद्राच्या लाटांमुळे आचरे समुद्र किनाऱ्यावर आलेल्या दोन ऑलिव्ह रिडले या कासवांना स्थानिकानी जीवदान देत पुन्हा समुद्रात सोडले

आचरा समुद्र किनारी आज पहाटे साडे पाच वाजण्याच्या दरम्यान फेरफटका मारताना कासव संवर्धक श्री सुर्यकांत आबा धुरी यांना समुद्र किनारी पाण्याच्या प्रवाहा बरोबर वाहत आलेल्या मासेमारी जाळ्याच्या गुंत्यात दोन कासव अडकून पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ श्री एकनाथ धुरी व सुर्यकांत रघुनाथ धुरी याच्या मदतीने दोन्ही कासवांना जाळ्यातून सुखरूप सोडवनूक करीत त्यांच्या नैसर्गिक अधिवासात समुद्रात सोडून जीवदान दिले.

You cannot copy content of this page