⚡मालवण ता.०५-: मालवण एसटी आगारातील आगार लेखाकार उदय उत्तम खरात (वय ३६ रा. सासवडे, कराड) यांचे मंगळवारी सकाळी आकस्मिक निधन झाले. उदय खरात यांना पहाटे अस्वस्थ वाटू लागल्याने एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु रुग्णालय प्रशासनाने उदय खरात यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.
उदय खरात यांनी १२ वर्षे मालवण आगारात सेवा बजावली होती. आज खरात यांची प्रकृती अत्यवस्थ बनल्याची माहिती मिळताच आगार प्रमुख सचेतन बोवलेकर यांच्यासह अनेक कर्मचारी यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली होती. मृतदेह विच्छेदनासाठी हलविण्यात आला होता. तरूण अधिकाऱ्याचा आकस्मिक मृत्यू झाल्याने कर्मचाऱ्यांकडून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.
