त्रिंबक येथे सामूहिक शेतीचा प्रयोग

बचत गटाच्या माध्यमातून केली श्री पद्धतीने लागवड

⚡मालवण ता.०५-: वाढत्या खतांच्या किंमतीमुळे आणि अपुऱ्या मनुष्यबळामुळे शेती परवडत नसल्याची ओरड मारली जात असल्याने पडीक क्षेत्रात होणारी वाढ लक्षात घेऊन त्रिंबक येथील महिलांनी एकत्र येत कषी विभागाच्या साहाय्याने श्री पद्धतीने शेती लागवड करून कृषी क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला आहे

त्रिंबक येथील ठाणेश्वर ग्रामसंघ महिला बचत गटाच्या माध्यमातून येथील महिला स्नेहलता वामन मेस्त्री, मोहिनी मोहन घाडीगांवकर, पद्मजा अनिल साटम,रेश्मा रामचंद्र मेस्त्री, सीमा संतोष घाडीगांवकर, छाया नागेश साटम,पुजा सुतार,कविता किशोर त्रिंबककर आदींनी एकत्र येत
येथील पडीक क्षेत्रावर ६४४४ इंद्रायणी व वालय जातीच्या भाताची लागवड केली.यासाठी त्यांना तालुका कृषी अधिकारी व्ही जी गोसावी, मंडळ कृषी अधिकारी ए आर कांबळे, कृषी पर्यवेक्षक डी के सावंत, त्रिंबक येथील कृषी सहायक सुशिलकुमार शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

You cannot copy content of this page